Type Here to Get Search Results !

* *दोन दीवसा आधी नांदुरा शहरात ४१ तलवारी जप्त आज खामगांव शहरात १६ तलवारी जप्त *

*दोन दीवसा आधी नांदुरा शहरात  ४१ तलवारी जप्त आज खामगांव शहरात १६ तलवारी जप्त **


 (खामगांव प्रतिनिधी)                                                                                                                                                                                        खामगांव शहरात ्अ्वैधरित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी व विकत घेतल्या प्रकरणी शहर पोलिसांनी एकावर तर शिवाजी नगर पोलिसांनी ७ जणांवर अशा एकूण ८ आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या जवळून १६ तलवारी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसाआधी नांदुरा येथेही ४१ तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या.

येथील मेहबुबनगर भागातील अब्दुल इम्रान इब्दुल जलील (२५) याने नांदुरा येथील शेख इरफान शेख भिकारी कुरेशी याच्या मार्फत १३ ऑगस्ट रोजी ७ तलवारी विकत घेतल्या होत्या. त्या तलवारी शेख नदीम शेख


सरदार रा. मेहबुब नगर खामगाव तलवारी सह मुद्देमाल जप्त केला आहे. सदर विकत घेणारे जवळुन ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

तलवारी गर 'शिरोही' असे लिहिलेले असून  २ वर्षाची गॅरंटी असे नमूद आहे. त्रिशुलची निशाणी तलवारीच्या मुठेवर आहे. 

अब्दुल जलील याच्या मेहबुबनगर चांदमारी घरकुलातून जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत पीएसआय दीपक  इलामे यांनी शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी अब्दुल इम्रान अब्दुल जलील, शेख ईरफान व शेख नदीम यांच्या विरुध्द कलम ४, २५, ७, २५ शस्त्र अधिनियम सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी मोहम्मद सुलतान मोहम्मद आरीफ (२५), मुजाहिदखान अनिसखान (३०) दोन्ही रा. फाटकपुरा या दोघांच्या घरातून अनुक्रमे ३ व १ अशा ४ तलवारी जप्त केल्या आहेत. तर शाहबाजखान ईस्माईलखान (२५), मोहम्मद फारुख मोहम्मद शफी (२४), इद्रीस इस्माइल गवळी (२५), युसुफखान अयुबखान (२२), शेख सादीक शेख नाशीर (२८) रा. बर्डेप्लॉट या ५ जणांनी अवैधरित्या विकत घेतलेल्या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. त्यांनी त्या तलवारी एकत्रितपणे बर्डेप्लॉट भागातील असलेल्या कब्रस्थान जवळील झाडाझुडपा मध्ये पोत्यामध्ये लपवून ठेवल्या होत्या. त्या पाचही तलवारी अवैधरित्या विकत घेतल्या. त्या

तलवारीसुध्दा पोलिसांनी जप्त केला.

शिवाजी नगर पोलिसांनी वरील सातही 

आरोपींविरुध्द कलम ४, २२, ७, २५ शस्त्र अधिनियम सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला. असुन पुढील  तपास एपीआय आशिष चेचरे करीत आहे.

 

Post a Comment

0 Comments