Type Here to Get Search Results !

बोरी अडगाव येथे पवित्र श्रावण मास निमित्त १,११,१११ अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळा समाप्ती व भव्य महाप्रसादाचे आयोजन

 बोरी अडगाव येथे पवित्र श्रावण मास निमित्त १,११,१११ अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळा समाप्ती व भव्य महाप्रसादाचे आयोजन





| बोरी अडगाव (का. प्र. ) :- दरवर्षीप्रमाणे यंदाही बोरी

| अडगाव येथील श्री. मनकामनेश्वर महादेव मंदिरामध्ये पवित्र श्रावण मासानिमित्त दररोज उज्जैन येथील ब्राह्मणांच्या हस्ते मंत्रोपचाराने शिवलिंग अभिषेक करण्यात आला या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता दि. २४/८/२०२५ रविवार रोजी भव्य महाप्रसादाने करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत होम हवन मंत्रोपचार व महापूजा चालणार असून दुपारी १२ वाजता पासून महाप्रसादस सुरुवात करण्यात येणार

आहे. तरी या भव्य महाप्रसादाचा तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिव महाराज पाटील व समस्त गावकरी मंडळी बोरी अडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थिती लावतात आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी दर्शनाकरीता सुध्दा हजारो नागरीक येत असतात.

पवित्र श्रावण मास अखंड शिवलिंग महाअभिषेक शिवलिंग  सोहळा व भव्य महाप्रसाद

Post a Comment

0 Comments