*गुटखा घेऊन जाणारा कंटेनर खामगांव तालुंक्यातील पारखेड फाट्या जवळ पकडला*
*लाखोंचा माल जप्त बुलढाणा स्थानिक गन्हे शाखेची मोठी कारवाई**
(राजु घाटे खामगांव)खामगाव | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदुरा रोडवरील पारखेड फाट्यानजीक गुटख्याचा मोठा साठा असलेला कंटेनर पकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईनंतर गुटखा माफियांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गुप्त माहीती च्या आधारे पारखेड फाटा परिसरात उभ्या
असलेल्या कंटेनरवर संशय आल्याने तपासणी करण्यात आली. तपासात कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळला. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तत्काळ कंटेनर खामगाव ग्रामीण पो.स्टे.ला आणून अन्न व औषध प्रशासनाला
कारवाईसाठी पाचारण केले. त्यानंतर गुटखा साठ्याची मोजणी करण्यात आली. यामध्ये लाखो रूपयांचा प्रतिबंधित गुटखा असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाईनंतर अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही धाडसी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पथकातील पोलीस कर्मचारी अवीनाश जायभाये यांच्यासह दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले व चालक निवृत्ती पुंड यांनी सिंहाचा वाटा उचलला.

Post a Comment
0 Comments