Type Here to Get Search Results !

*घाटपुरी येथील 500 युवा ग्रुप सामाजिक संघटनेच्या वतीने, प्रजासत्ताक दिना निमित्ताने शासकीय कार्यालयात सविधान प्रस्ताविका देण्यात आल्या भेट.*

 खामगाव:- घाटपुरी प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजवंदन, संचलन आणि भाषणांचा दिवस नाही; तो सर्वांनी आत्मचिंतन करण्याचा आणि लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करताना कर्तव्यांची जाणीव ठेवली पाहिजे या उद्धेशाने 500 युवा ग्रुप या सामाजिक संघटनेच्या वतीने आज प्रजासत्ताक दिना निमित्ताने शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयात संविधान प्रस्ताविका भेट देण्यात आल्या या वेळी संघटनेचे शुभम पहुरकर,अंकित जाधव,अमोल शेगोकार,गिरीश उमाळे,पवन घोपे,संतोष लाहुडकर,शुभम नाईक,रितेश शेगोकार,अभय इंगळे,गौरव नाईक,कपिल हेलोडे व इतर सदस्य उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments