खुमगाव येथे इले. मीटरच्या शॉर्टसर्किटमुळे घराला लागली आग संसार उपयोगी साहित्य जळून खाक
दि. 26.01.26
नांदुरा तालुक्यातील खुमगाव येथील ज्ञानेश्वर अरुण काटोने यांच्या घराला सकाळी 4 ते 5 वाजेदरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक
ज्ञानेश्वर काटोने व त्याची पत्नी मजुरी काम करण्याकरता बाहेरगावी गेले असता घरी असलेले दोन लहान मुली शेजारील आबाआजीकडे झोपण्याकरता गेलेले होते त्यामुळे जीवितहानी टळली
ज्ञानेश्वर काटोने यांची आजी झोपेतून उठली असता घराला आग लागलेली दिसली त्यामुळे आरडाओरडा केल्याने शेजारी पाजारी उठून आग विजवण्यासाठी धावून आले त्यामुळे पुढील अनर्थ टळला

Post a Comment
0 Comments