शिरसगाव देशमुख ग्राम पंचायत वतीने ५% निधी वाटप
खामगाव (सिध्देश्वर निर्मळ):- ग्रामपंचायत स्तरावर
असलेला दिव्यांग स्वनिधीचे वर्ष २०२५-२०२६ चे वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सरपंच सौ. सुवर्णा श्रीकृष्ण टिकार, उप सरपंच अल्ताफ पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पिंटूभाऊ टीकार, दिव्यांग शक्ती चे संपादक व विराट मल्टिपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक व ग्रामसेवक धनोकार हे उपस्थित होते.
सदर शिरसगाव देशमुख इथे ५% निधी वाटप जवळपास ४० दिव्यांग बांधवांना करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक धनोकर यांनी सांगितले की आमची ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकऱ्यांच्या सहकायनि गावातील विकास कामे करत असताना दर वर्षी दिव्यांग बांधवांना
स्व निधी वितरित करण्यात येतो त्यांच्या अडचणी सोडविणे आलेल्या योजनांची माहिती यांना ग्रा. पं. च्यामध्यमातून देत त्याच्या विकासासाठी लक्ष देत असते.
यावेळी ग्रा.पं. मधील सर्व नोंदणीकृत ४० दिव्यांग बांधवांना चेक स्वरूपात निधीचे वाटप करण्यात आले

Post a Comment
0 Comments