*
खामगाव उपविभागीय कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तहसीलदारांवर कारवाई करण्यासाठी पत्रकाराचे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण*
खामगांव (प्रतीनिधी ) अवैधरित्या
रेती उपसा आणि त्याची वाहतुक,
विक्री करणाऱ्यांवर कारवाई
करण्याकरीता महसुल विभागातील
तलाठी, मंडळ अधिकारी आणि
इतर कर्मचारी जीवाचे रान करीत
आहेत. कधी कधी त्यांच्यावर
जीवघेणे हमले सुध्दा होतात मात्र
जीवाची पर्वा न करता ते आपले
कर्तव्य चोख बजावत आहेत. अशाच प्रकारे महसुल कर्मचाऱ्यांनी नुकतीच दोन अवैध रेतीची वाहतुक
करणारी वाहने पकडली. त्या वाहनांसमोर उभे राहून फोटो सुध्दा काढले आणि ते प्रसार माध्यमांना सुध्दा
मिळाले मात्र खामगांव येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार (!) सुनिल पाटील यांनी मात्र त्यांच्यावर कोणतीही
कार्यवाही न करता त्यांना परस्पर सोडले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीकरीता
खामगांव प्रेस क्लबचे सहकोषाध्यक्ष तथा सा. बुलढाणा साहसीक चे संपादक मुबारकखान यांनी आज
सकाळपासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून हे एकदिवशीय
लाक्षणिक उपोषण आहे. यानंतरही तहसीलदार सुनिल पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास लवकरच
आमरण उपोषण करण्याचा इशारा सुध्दा मुबारकखान यांनी दिला असून या उपोषणाला सकाळपासूनच
खामगांव शहरातील सर्व पत्रकार बांधव भेट देवून आपला पाठिंबा देत आहेत. यापुर्वीही तहसीलदार
सुनिल पाटील यांनी अशाच प्रकारे आर्थिक देवाण घेवून अवैध रेतीची वाहने सोडली असतील का?
असाही संशय व्यक करण्यात येत असून त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments