खामगांव शहरात हंसराज नगर शेगाव रोड खामगाव येथे महानुभाव पंथीय ज्ञान प्रबोधन सत्संग सोहळा पहिला दिवस उत्तम रित्या पार पड
Maharashtra DarshanJanuary 25, 20260
*
खामगांव शहरात हंसराज नगर शेगाव रोड खामगाव येथे महानुभाव पंथीय ज्ञान प्रबोधन सत्संग सोहळा पहिला दिवस उत्तम रित्या पार पडला* पूजा आरती उपहार प्रमुख अतिथींचे स्वागत व प्रसाद सर्व कार्यक्रम स्वच्छ व सुंदर वातावरणात पार पडले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती बीजेपी जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख उपस्थित होते तसेच सुरेश भाऊ वनारे शिवसेना विधानसभा अध्यक्ष यांची पण प्रमुख उपस्थिती लाभली तसेच कीर्तनकार पक्षी श्री दादाराव जिओके यांच्या कीर्तनाने खामगाव शहर भारावून गेले महानुभाव पंथाचा साक्षात्कार व ज्ञान प्रबोधनाची चाहूल लागली. जाळीचा देव इथून आलेले संत महंत व ऋषी यांची हंसराज नगर या कॉलनीत आशीर्वाद मिळाले या सत्संगास प्रमुख पाहुणे म्हणून विकी भाऊ सावंत बीजेपी कार्यकर्ता चंदाताई दत्काळ हंसराज नगर कॉलनी विद्यमान सरपंच सौ हर्षा अजय दाते तसेच माजी सरपंच संजय भाऊ जाधव रंजनाताई राठोड सुरेश भाऊ ददगाळ अजय भाऊ दाते प्रवीण तंबोले गोकुळ बुंदेले. सौरत्नाताई संतोष खंडारे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन बाळकृष्ण मेहकर कर बाबा यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रंजनाताई राठोड यांनी केले
Post a Comment
0 Comments